Friday, April 17, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

BREAKING | उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया!

Hello Solapur by Hello Solapur
31-Jan-2026 18:40 pm
in राजकारण
0
0
SHARES
517
VIEWS

HELLO SOLAPUR | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज लोकभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. अजितदादांच्या निधनानंतर पहिल्यांदाच त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या X हॅन्डलवर पोस्ट केलीय त्याचा सारांश खालीलप्रमाणे आहे…

आज लोकभवन, मुंबई येथे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना माझं मन अत्यंत भावूक झालं आहे. हा क्षण माझ्यासाठी केवळ राजकीय नाही, तर आयुष्यभराची जबाबदारी आणि जनतेप्रती असलेल्या बांधिलकीची जाणीव करून देणारा आहे.

आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि समाजातील वंचित घटकांसाठी संघर्ष केला. सत्तेत असताना असो किंवा विरोधात, त्यांनी नेहमीच सामान्य माणसाच्या प्रश्नांना प्राधान्य दिलं. लोकांच्या अडचणी सोडवणं हेच त्यांचं राजकारण होतं… आणि जनतेची सेवा हाच त्यांचा धर्म होता.

आज ते आपल्यात नाहीत, ही वेदना शब्दांत व्यक्त करणं कठीण आहे. दादांच्या अकाली जाण्याने मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. पण त्यांनी दिलेली शिकवण, त्यांची कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची अढळ बांधिलकी मला प्रत्येक क्षणी प्रेरणा देत राहते.

‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या समतेच्या, सामाजिक न्यायाच्या आणि प्रगतीच्या विचारांवर चालत महाराष्ट्र घडवण्याचा त्यांचा ध्यास होता. त्याच विचारांचा वारसा पुढे नेण्याचा मी आज निर्धार करतो.

उपमुख्यमंत्री पद ही माझ्यासाठी सत्ता नसून सेवा आहे.
ही खुर्ची नाही, तर जबाबदारी आहे.
हा मान नाही, तर जनतेच्या विश्वासाचं ओझं आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी, कामगार, महिला, युवक, विद्यार्थी, उद्योजक आणि प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबाच्या विकासासाठी शासन तुमच्या दारात नेण्याचं काम आम्ही करू.
न्यायप्रिय, पारदर्शक आणि सर्वसमावेशक प्रशासन देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू.

या कठीण प्रसंगी महाराष्ट्रातील जनतेने दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठिंबा हेच माझं खरं बळ आहे. तुमच्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मी अहोरात्र काम करत राहीन.

चला, आपण सर्वजण मिळून एक समताधिष्ठित, प्रगत आणि विकसित महाराष्ट्र घडवूया.


Tags: Ajit PawarDCMDcm Sunetra PawarMahayuti SarkarMarathi newsMarathi PoliticsNcp Ajit pawar gatpoliticsSunetra Pawar
Previous Post

पंढरपूर–मंगळवेढा रस्त्यावर भीषण अपघात; 4 भाविकांचा मृत्यू, ६ गंभीर जखमी

Next Post

अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

Related Posts

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

April 16, 2026

मुलांच्या सर्वांगण विकासासाठी समर्पित नाट्य शाळेच्या वतीने ‘गंमत बालनाट्य शिबीराचे’ आयोजन

April 11, 2026

सोलापुरातील ‘या’ पदाधिकाऱ्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडून शिफारस; भाजप वर्तुळात मोठी चर्चा

April 7, 2026

सोलापूर झेडपीचे अध्यक्षपद बार्शीकडे? यांचे नाव जवळपास निश्चित

March 15, 2026

सोलापूर झेडपीच्या गटनेते, प्रतोद अन् प्रवक्तेपदी मराठा समाजाला संधी; अध्यक्षपद मात्र गुलदस्त्यात!

March 10, 2026

शिवसेनेकडून राज्यसभेवर गेलेल्या ज्योती वाघमारे नक्की कोण आहेत?

March 5, 2026
Next Post

अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

April 16, 2026

सोलापूर शिवसेनेची शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख सर्वच कार्यकारिणी बरखास्त

April 15, 2026

ब्रेकिंग : पंढरपूरमधील ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक वळण; तरुणीने स्वतःच ॲसिड ओतले….

April 13, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In