Thursday, April 16, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

उद्योजक अनंत अंबानींच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात माणुसकीचा महाउत्सव; शिखर पहारिया फाउंडेशनचा पुढाकार

Hello Solapur by Hello Solapur
08-Apr-2026 22:54 pm
in महाराष्ट्र
0
0
SHARES
95
VIEWS

HELLO SOLAPUR (प्रतिनिधी) : प्रसिद्ध उद्योगपती अनंत मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर आणि जिल्ह्यात समाजसेवेचा भव्य उपक्रम राबविण्यात येणार आहे. शिखर पहारिया फाउंडेशनच्या वतीने गुरुवार, दि. ९ एप्रिल २०२६ रोजी तब्बल १४ ठिकाणी विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, “एक वाढदिवस… हजारो हास्य… माणुसकीचा महोत्सव” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली जाणार आहे.



या उपक्रमाची सुरुवात सोलापूर शहरातील जुनी मिल कंपाऊंड मैदान येथे होणार असून, येथे ५ हजार गरजू कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात येणार आहे. याच ठिकाणाहून विविध उपक्रमांना एकाच वेळी प्रारंभ केला जाणार आहे. फाउंडेशनचे तन्वीर शेख आणि राज सलगर यांनी याबाबत माहिती दिली.


शिक्षण, आरोग्य आणि स्वावलंबनाकडे मोठी पाऊले :

या महाउपक्रमात शिक्षण आणि स्वावलंबनावर विशेष भर देण्यात आला आहे.

२०० विद्यार्थिनींना सायकली देऊन त्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर केला जाणार आहे

१ हजार विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप

३०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक योजना

१० शाळांमध्ये आरओ फिल्टर प्लांट बसविणे

शाळांना डिजिटल स्मार्ट बोर्ड आणि संगणक संच उपलब्ध करून देणे

महिलांच्या सक्षमीकरणासाठी २०० महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार असून, त्यांना स्वावलंबनाची संधी मिळणार आहे.

आरोग्य आणि पाणी सुविधांवर विशेष लक्ष :

आरोग्य क्षेत्रातही मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी १०० मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत


पाणी समस्येवर उपाय म्हणून :

शहर आणि जिल्ह्यात १०० ठिकाणी जनावरांसाठी पाण्याची पात्रे बसविण्यात येणार

कुंभारी येथील आण्णाभाऊ साठे नगर येथे बोअरवेल आणि सबमर्सिबल पंप बसविण्यात येणार

इतर महत्त्वाचे उपक्रम :

अनाथ आश्रमासाठी ५० बेडचे वितरण

वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या घरांसाठी व मंदिरांसाठी १ हजार पत्र्यांचे वाटप

कुंभारी येथील गेनसिद्ध देवालयासाठी ५८.५ केव्हीए जनरेटर बसविणे

मान्यवरांची उपस्थिती, नागरिकांना आवाहन :

या कार्यक्रमास विविध मान्यवर आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. फाउंडेशनचे धर्मराज गुंडे, कौशल शिंदे, सूर्या शेट्टीयार, तुषार जोगदनकर आणि धीरज कारंडे यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये

एकाच दिवशी १४ ठिकाणी उपक्रमांचे आयोजन

५ हजार कुटुंबांना अन्नधान्य किट

शिक्षण, आरोग्य, पाणी व स्वावलंबनावर भर

३०० विद्यार्थी दत्तक योजना

१ हजार बॅग, २०० सायकली वाटप

१०० मोफत शस्त्रक्रिया

२०० महिलांना शिलाई मशीन

सोलापूर जिल्ह्यात एकाच दिवशी इतक्या व्यापक प्रमाणावर राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे खऱ्या अर्थाने “माणुसकीचा महोत्सव” अनुभवायला मिळणार आहे.

Tags: Anant Mukesh AmbaniBreaking newsBusinessmanIndiaMaharashtra NewsShikhar PahariyaShikhar Pahariya Foundationsolapur news
Previous Post

सोलापुरातील ‘या’ पदाधिकाऱ्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडून शिफारस; भाजप वर्तुळात मोठी चर्चा

Next Post

मुलांच्या सर्वांगण विकासासाठी समर्पित नाट्य शाळेच्या वतीने ‘गंमत बालनाट्य शिबीराचे’ आयोजन

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड

February 26, 2026

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन; 7 वेळा खासदार ते नेत्रदिपक कामगिरी

December 12, 2025

सोलापूरच्या झोपडपट्टीतून थेट शिवसेनेच्या स्टार प्रचारक!, संघर्ष कन्येची स्फूर्तीदायक यशोगाथा

November 20, 2025

भाजप प्रवेशानंतर कोठे समर्थकांनी घेतला मुख्यमंत्री फडणवीसांचा आशीर्वाद; महेश कोठेंच्या आठवणींना दिला उजाळा

November 12, 2025

राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका जाहीर; असा आहे कार्यक्रम

November 4, 2025

राज्यातील झेड.पी, महापालिका, नगरपालिकेच्या निवडणुका आज जाहीर होणार

November 4, 2025
Next Post

मुलांच्या सर्वांगण विकासासाठी समर्पित नाट्य शाळेच्या वतीने ‘गंमत बालनाट्य शिबीराचे’ आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

April 16, 2026

सोलापूर शिवसेनेची शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख सर्वच कार्यकारिणी बरखास्त

April 15, 2026

ब्रेकिंग : पंढरपूरमधील ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक वळण; तरुणीने स्वतःच ॲसिड ओतले….

April 13, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In